Akola Crime जयेश गावंडे
महाराष्ट्र

युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कर्जपायी संपविली जीवन यात्रा

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोल्यातील अकोट (Akot) तालुक्यातल्या उमरा येथील एका शेतकऱ्याने (farmer) वाढत्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहन हरीदास इंगळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने स्वतः च्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतकर्‍याने (farmer) आपल्या २ एकर कांदा (Onion) पेरणी केली होती.

हे देखील पाहा-

परंतु या वर्षी कांद्याला उत्पादन घटले आहे. व त्यातच भाव न मिळाल्याने आता बँकेचे कर्ज भरण्यासाठी उसनवारी पैसे घेऊन आपले पिक कर्ज भरले होते. नापीकीमुळे या शेतकऱ्याला कर्ज भरलेल्या पैसे कसे परत करावे ही चिंता सतावत होती. यांच्याकडे ३ एकर शेती आहे. त्यांना गेल्या बर्‍याच वर्षांपासून अपेशित उत्पादन होत नसल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेत या शेतकऱ्याने स्वताच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मागे २ विवाहित बहिणी आई- वडील असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून, शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात अकोट येथे दाखल करण्यात आला होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra News Live Update: मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर येणार

Mangalsutra Designs: महिलांसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ‘हे’ ५ शॉर्ट मंगळसूत्र पॅटर्न्स; मॉडिश आणि क्लासी लूकसाठी बेस्ट

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

SCROLL FOR NEXT