Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime: औरंगाबादेत खळबळ! 3 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या!

नोटमध्ये आई-वडिलांची मागितली माफी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद - जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने अभियंता पतीच्या त्रासाला कंटाळून पाच दिवसांपूर्वी स्वतः रक्तवाहिनित इन्सुलिनचे इंजेक्शन घेतले होते, तेव्हापासून तिच्यावर गाठी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू होते.

हे देखील पाहा -

मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि दिराच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टर तरुणीच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोटी सापडल्याची माहिती मिळत आहे. 'मम्मी पप्पा मला माफ करा' असे तीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सुशिक्षित डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डॉक्टर तरुणीचे धनंजय मोरे यांच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही तीन महिन्यांपूर्वी लग्नही केलं होतं. पण लग्नाच्या काही महिन्यांतच डॉक्टर तरुणी तणावाखाली होती आणि त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तरुणीच्या आईवडिलांसह नातलगा या घटनेनं धास्तावले आहे. या सुसाईट नोटच्या आधारे औरंगाबाद पोलीस पुढील तपास करत असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

SCROLL FOR NEXT