Langya Henipavirus: देशात अजूनही कोरोनाचा (Corona) धोका कायम आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखी एका नवीन विषाणूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झूनोटिक लांग्या व्हायरस आढळून आला आहे. आतापर्यंत अनेकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. अहवालानुसार, आतापर्यंत 35 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. याला लंग्या हेनिपाव्हायरस असेही म्हणतात.
पूर्व चीनच्या शेंडोंग आणि मध्य चीनच्या हेनान परीसरात लांग्या हेनिपाव्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहेत. या विषाणूची ओळख आणि प्रसार यावर लक्ष ठेवण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
हे देखील पहा -
चीनमध्ये नवीन लांग्या विषाणूचा उद्रेक झाल्याची पुष्टी झाली आहे. हा नवीन विषाणू प्राण्यांपासून पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा विषाणू मानवांना संक्रमित करू शकतो. पूर्व चीनच्या शेंडोंग आणि मध्य चीनच्या हेनान परिसरात या विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. चीन आणि सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (NEJM) मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, या विषाणूची आतापर्यंत 35 लोकांना लागण झाली आहे.
तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी सांगितले की, संशोधनातून असे दिसून आले आहे की विषाणूचा मनुष्य-ते-माणसात प्रसार होत नाही. मात्र, याबाबत अधिक माहिती येईपर्यंत सावध राहण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.
हेनिपा व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे काय आहेत?
35 पैकी 26 रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. रुग्णांमध्ये पांढऱ्या रक्तपेशींमध्येही घट दिसून आली. इतकेच नाही तर प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे अशी लक्षणेही रुग्णांमध्ये आढळून आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.