यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निर्वाह भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत यवतमाळ ते पांढरकवडा असा लाँग मार्च काढला होत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना रात्रभर वस्तीगृहातच ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी वस्तीगृहाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शासकीय आश्रम शाळेत रात्रभर मुक्काम करून विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या, परंतु त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या समस्या अद्याप कायम असल्याचे या घटनेतून दिसून येते.
मंगळवारी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आंदोलन केले. त्यांनी मागणी केली की, आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या वस्तीगृहांसाठी लागू केलेल्या DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजनेमध्ये दरवर्षी महागाई दरानुसार वाढ केली जावी. या वाढीला दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी दिली जावी.
तसेच, विद्यार्थ्यांना वस्तीगृह प्रवेश प्राप्त झाल्यावर ८५% उपस्थिती अनिवार्य करावी आणि ६० दिवसांपेक्षा जास्त काळ वस्तीगृहात गैरहजर राहिल्यास त्यांचा वस्तीगृह प्रवेश रद्द करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.