Youth Found Dead After 13 Days Saam Tv
महाराष्ट्र

आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, महाराष्ट्र पुन्हा हादरला!

Youth Found Dead After 13 Days: यवतमाळमधील युवक १३ दिवसांपासून बेपत्ता. तरूणाचा कुजलेल्या अवस्थेत मृत आढळला. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • १३ दिवस बेपत्ता राहिल्यानंतर युवकाचा मृतदेह आढळला.

  • रुमालात सुसाईड नोट आढळली.

  • परिसरात खळबळ.

यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. १३ दिवसांपासून युवक बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. रूमालमध्ये नातेवाईकांना सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अजय शेंडे असे मृत तरूणाचे नाव आहे. १७ सप्टेंबरपासून तरूण बेपत्ता होता. १३ दिवसांपासून अजय घरात परतलाच नव्हता. त्याचे कुटुंब त्याचा शोध घेत होते. मात्र, तब्बल १३ दिवसांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. वणीच्या कायर येथे अजयचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

अजय शेंडे हा मराठा आंदोलक होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यानं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तरूणाच्या मृतदेहाजवळ नातेवाईकांना सुसाईड नोटही सापडली.

रूमालात तरूणानं सुसाईड नोट गुंडाळली असल्याची माहिती आहे. तसेच तरूणाजवळ विषारी औषध खरेदी केलेली पावतीही आढळली. विषारी औषध पिऊनच त्यांनं आयुष्य संपवलं असल्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. तरूणाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World Highest Bridge: दोन तासांचा प्रवास , दोन मिनिटांत; जगातील सर्वात मोठ्या ब्रीजचे फोटो समोर

Maharashtra Flood: शेतकऱ्यांसाठी पुढच्या २ दिवसांत ठोस निर्णय घेणार, उमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

स्पेसक्राफ्ट एका दिवसात किती फेऱ्या मारतं?

Crime News: बॉक्सर मेरी कोमच्या घरी चोरी, ३ अल्पवयीन मुलांना अटक; चोरीस गेलेल्या वस्तू जप्त

SCROLL FOR NEXT