Accident News
Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News: हेवी ट्रकची कारला जोरदार धडक, गाडीला अक्षरश: फरपटत नेलं; तरुण डॉक्टर दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur News: : यवतमाळमध्ये एका भीषण अपघातात तरुण डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नव्या वरोरा-वणी मार्गावर कारचा भीषण अपघात झाला. डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार अशी मृत डॉक्टर दाम्पत्याची नावं आहेत.

डॉ. अश्विनी गौरकार आणि डॉ. अतुल गौरकार हे यवतमाळमधील मारेगाव शहरातील नामवंत डॉक्टर होते. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या महामार्गावर शेंबळ गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या हेवी ट्रकने गौरकार यांच्या गाडीला धडक दिली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

डॉक्टर दाम्पत्य नागपूरला काही वैयक्तिक कामानिमित्त जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकने कारला चक्क 100 ते 150 मीटर समोर फरफटत नेले. यात डॉक्टर अश्विनी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले होते. (Latest News Update)

अपघाताची मिळताची आजूबाजूचे लोक मदतीला धावले. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तातडीने अतुल यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला.

वरोरा पोलिस अधिक तपास करत आहेत. गौरकार दाम्पत्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. घटनेची माहिती पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT