India Covid Update: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं टेन्शन वाढलं; PM मोदींनी बोलावली हाय लेव्हल मीटिंग

PM Modi Emergency Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय लेव्हल मीटिंग बोलावली आहे.
PM Modi-Corona
PM Modi-CoronaSaam TV
Published On

Covid Update: देशातील कोरोनाची वाढणारी आकडेवारी चिंतीत करणारी आहे. कोरोना पुन्हा डोकं वर काढतो की अशी स्थिती निर्माण झाली आहे. हाच धोका ओळखून केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय लेव्हल मीटिंग बोलावली आहे.

PM Modi-Corona
Modi Poster news : ‘मोदी हटाओ देश बचाओ’ दिल्लीत जागोजागी बॅनरबाजी; ६ जणांना अटक तर १०० हून अधिक FIR दाखल

देशातील कोरोनाची स्थिती आणि आरोग विभागाच्या तयारीला आढावा या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 1134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7026 झाली आहे. (Latest News Update)

काल म्हणजे 21 मार्च रोजी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि दक्षिणेकडील केरळ राज्यात कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 5,30,813 वर पोहोचला आहे.

देशातील कोरोनाची सद्यस्थिती

देशात काल कोरोनाच्या 699 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी कोरोनाचे आणखी मंगळवारच्या तुलनेत 435 नवीन रुग्णांची वाढ झाली. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7026 वर पोहोचली आहे. अशा प्रकारे, गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 466 ची वाढ नोंदवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com