Yavatmal Crime News Saam TV
महाराष्ट्र

Yavtmal News : गणरायाचा प्रसाद घ्यायला गेला अन् घात झाला; तरुणाचा जागेवरच गेला जीव, यवतमाळमध्ये काय घडलं?

Yavatmal Crime News : यवतमाळमधील आर्णी शहरात घडलेल्या घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. गणपती बाप्पासमोरच एका तरुणाची दगड तसेच विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे.

Satish Daud

सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक ठिकठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यामुळे काही भक्तांमध्ये धक्काबुक्की आणि किरकोळ वादाच्या घटना देखील घडत आहेत. अशातच यवतमाळमधील आर्णी शहरात घडलेल्या घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. गणपती बाप्पासमोरच एका तरुणाची दगड तसेच विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे.

बादल केशव टाले वय 23 असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आकाश डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेनं संपूर्ण आर्णी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आर्णी शहरातील संभाजीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाजवळ गणरायाच्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

मृत बादल हा प्रसाद घेण्यासाठी त्याठिकाणी गेला. यावेळी आरोपी आकाश याच्यासोबत त्याचा किरकोळ कारणावरून वाद झाला. नागरिकांनी त्यांचा हा वाद (Crime) सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. यावेळी आरोपी आकाश याने बादलच्या डोक्यात दगड तसेच विटांनी वार केला.

यामुळे बादल गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, बादलच्या हत्येची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आकाश याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT