Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाई येथील महिलेचा आत्मदाहनाचा प्रयत्न केला. घरकुल मिळत नसल्याने महिलेचा संताप अनावर झाल्‍याने सदर प्रकार केला. शहर पोलिसाच्या (Police) सतर्कमुळे अनर्थ टळला आहे. (Yavatmal News Gharkul Yojana)

घरकुल मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून ही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या (Yavatmal) जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदाहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सातर्कतेने आत्मदाहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शांता बनसोड असे महिलेचे नाव असून महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे.

सरपंच, ग्रामसेवकाकडून प्रतिसाद नाही

घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्यासोबत पेट्रोल होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT