Uday Samat News  saam
महाराष्ट्र

Uday Samat: मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक; यवतमाळमधील घटना

Yavatmal News : उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री उदय सामंत आणि कार चालक सुखरूप आहेत. चालकाने घडलेल्या प्रकरणाची तक्रार पोलिसात दिलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(संजय राठोड, यवतमाळ)

Minister Uday Samants Convoy Yavatmal :

यवतमाळमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक झालीय. अज्ञात व्यक्तीने सामंत यांच्या ताफ्यातील कारवर दगड फेकून मारला. ही घटना यवतमाळमधील राळेगाव येथील प्रचारसभेवेळी घडली.

याप्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण वाशिम-यवतमाळमध्ये प्रचारासाठी गेलो होतो. तेथील राळेगाव येथे प्रचार करत असताना ते ज्या कारमध्ये बसणार होते त्या कारवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. कोणी दगड मारला, त्याचा हेतू काय होता याची काही कल्पना आपल्याला नसल्याचं सामंत म्हणालेत. परंतु घडलेल्या प्रकरणाविषयी चालकाला पोलिसात तक्रार करण्यास सांगितलं.

या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मीही सुखरूप असल्याचं सामंत म्हणालेत. दरम्यान अशा घटना आधीही घडल्याचं सामंत म्हणालेत. पुण्यातही त्यांच्या कारवर दगडफेक झाली होती असं सामंत प्रतिक्रिया देताना म्हणालेत.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील या उमेदवार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय देशमुख हे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असल्या कारणाने शिवसैनिकांमध्ये चढाओढ सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सिडको भूखंडांचे होणार फ्री-होल्डमध्ये रूपांतर; कशी असणार प्रक्रिया?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

SCROLL FOR NEXT