तरुणाने बाथरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; अचानक गर्लफ्रेंडला प्रचंड रक्तस्त्राव, पुढील काही क्षणात मृत्यू

telangana crime news : तरुणाने गर्लफ्रेंडशी बाथरुममध्ये शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अचानक गर्लफ्रेंडला रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.
telangana news
telangana crime newsSaam tv
Published On
Summary

२२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

तरुणीचा मृत्यू लैगिंक शोषणानंतर झाल्याचा पीडितेच्या नातेवाईकांचा आरोप

पोलिसांकडून तरुणाला अटक

तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्यातील मूसेपेट मंडलमध्ये २२ वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तरुणीचा मृत्यू लैगिंक शोषणानंतर झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तरुण हा मृत तरुणीचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगण्यात येत आहे.नेमकं काय घडलं?

telangana news
अकोल्यात धक्कादायक निकाल; भाजपचे ५० नगरसेवक विजयी; काँग्रेस, वंचित अन् ठाकरेसेनेला किती जागा? पाहा आकडेवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणी दोघेही एकमेंकांना ओळखत होते. आरोपी बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला १७ डिसेंबर रोजी रात्री भेटायला बोलावले. बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला घरातील बाथरुममध्ये घेऊन गेला. बाथरुममध्ये शारीरिक संबंध ठेवताना तरुणी अचानक बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला अचानक रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे बॉयफ्रेंड घाबरला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बॉयफ्रेंडने तिला घरातून बाहेर आणलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करायला निघाला. परंतु रुग्णालयात दाखल करण्याआधी डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले.

telangana news
Maharashtra Politics : ईव्हीएम मशीनमध्ये घोळ; निवडणूक निकालानंतर ७ कर्मचाऱ्यांचं निलंबन

तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवेकविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि जमाती अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला जलद गतीने सुरुवात केली आहे.

telangana news
Tuesday Horoscope : अडचणी स्वीकारून मार्ग काढावे लागेल; ५ राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे अन्यथा...

महबूबनगर पोलिसांनी सोशल मीडियावर पसरणारे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावरून होणाऱ्या राजकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अफवांपासून दूर राहा, असं आवाहन पोलिसांनी लोकांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com