Tuesday Horoscope : अडचणी स्वीकारून मार्ग काढावे लागेल; ५ राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे अन्यथा...

Tuesday Horoscope IN marathi : आज काही राशींच्या लोकांना अडचणीतून मार्ग काढावा लागेल. काहींना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
Horoscope in Marathi
Horoscope Saam tv
Published On

पंचांग

मंगळवार, २३ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष,विनायक चतुर्थी(अंगारक योग).

तिथी-तृतीया १२|१३

रास-मकर

नक्षत्र-श्रवण

योग-व्याघात

करण-गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आज विनायक चतुर्थी रिक्ता तिथी.आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या देण्यासाठीच असतात हे समजून घ्या. रिक्त होऊन जा. सामाजिक सेवेमधून प्रगती दिसते आहे. मात्र आपल्या तापटपणावर नियंत्रण ठेवून पुढे जावे लागेल .

वृषभ - देवी उपासना छान फले देणारी ठरेल. कितीही केले तरी आपण केलेल्या प्रयत्नांना यश तेव्हाच असते जेव्हा भगवंताची कृपा असते. हे आपल्याला जाणवेल. भाग्यकारक घटना घडणार आहेत. दिवस चांगला आहे.

मिथुन - काय ठरवले आणि काय होत आहे ! अशी भावना मनात कधी येते. आज या गोष्टी जास्त उफाळून येतील. एकट्याने प्रवास करताना थकून जाल. पण येणाऱ्या अडचणी स्वीकारून तुम्हालाच पुढे जावे लागेल. अचानक धनलाभ मात्र दिसतो आहे .

Horoscope in Marathi
Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार या शुभ वस्तू घरात ठेवा, हातात खेळता पैसा राहील

कर्क - संसारिक सुखामध्ये मन रमणार आहे. काही नव्याने वस्तूंची खरेदी घरी होईल. जोडीदाराला काय हवं काय नको याची जातीने आज चौकशी कराल. मन आनंदी आणि सकारात्मक राहील.त्यामुळे कामांमध्येही चांगली प्रगती आणि गती येईल.

सिंह - पाठीचे दुखणे डोके वर काढतील. कष्टाला पर्याय नाही पण यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या अधिकार मिळू शकेल. मामा कडून विशेष फायदा संभवतो आहे.

कन्या - विष्णू उपासना, गणेश उपासना आज फलदायी ठरणार आहेत.विनायक चतुर्थीची विशेष उपासना करावी. पैशाची निगडित व्यवहार होतील. प्रयत्नांना यश मिळेल. प्रेमामध्ये रंग बहरतील. दिवस चांगला आहे.

तूळ - सर्व सुखांसाठी दिवस चांगला आहे .संततीसाठी मात्र काहीतरी खर्च होईल. कुटुंबीयांकडून चांगल्या चार आनंदाच्या वार्ता कानावर येतील. घर खरेदी विक्रीमध्ये व्यवहार करायला आज हरकत नाही .

वृश्चिक - घराचे व्यवहार मार्गी लागले असतील तर आज त्यासाठी पैशाची तजबीज करावी लागेल. यासाठी आपले शेजारी जवळचे नातेवाईक किंवा भावंडे यांची मदत होऊ शकेल. जवळच्या प्रवासामधून प्रगती आणि फायदा संभवतो आहे.

धनु - भावंडांसाठी काहीतरी खर्च करावा लागेल. जे मिळाले आहे त्यात समाधान मानणे आज गरजेचं आहे. कदाचित वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये अति खोल न जाता समाधानाने वागणे गरजेचे आहे. गुंतवणूक मात्र योग्य ठरेल.

Horoscope in Marathi
Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

मकर - अनेक गोष्टी मनामध्ये ठेवून आपण नेहमीच वावरता. आज काही गोष्टींना वहिवाट करून दिलेले चांगले राहील. जवळच्या व्यक्तीला मनोगत सांगा. हृद्य भावना व्यक्त करा. मन आनंदी राहील एकटे असणे आणि एकांतात असणे यातील फरक आज ओळखून घेऊन पुढे जाल.

कुंभ - स्वतःसाठी पैसा खर्च करा. जसे की काही खरेदी, कदाचित तब्येतीच्या तक्रारी असतील तर औषधावर खर्च होईल. मोठे नियोजन जसे की परदेश गमन,शाळा, कॉलेज साठी असणारी ऍडमिशन यावर पैसा खर्च होऊ शकतो.

मीन - सजगतेने कामे करावे लागतील. यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवून चला. गुंतवणुकीतून लाभ. घरासाठी नाहक खर्च होतील. काही गोष्टी अडचणीच्या ठरतील पण त्यातून तुम्हालाच मार्ग काढावा लागेल. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com