yavatmal  saamTv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात कलम १४४ लागू

yavatmal News: जमावाद्वारे हिंसक कारवाया होऊ शकतात, यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू करण्याचे आदेश दिलेत.

Bharat Jadhav

Section 144 Enforced In Yavatmal :

आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला राज्यातील काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून १४४ कलम लागू केले जात आहे. बीड, नांदेड नंतर आता यवतमाळ जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले आहेत. (Latest News)

यवतमाळ जिल्ह्यात आरक्षणासाठी आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षणासाठी २७ ठिकाणी साखळी उपोषण तर २० पेक्षा अधिक गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महामार्गावरील रस्ता रोको दरम्यान जमावाद्वारे हिंसक कारवाया केल्या जाण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान २७ ऑक्टोबर रोजी उमरखेड जवळ एसटी बस जाळण्यात आली होती. बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे.

कलम काय आहे?

कलम १४४ हे "फौजदारी दंड संहिता १९७३ 3' अंतर्गत येणारे कलम असून हा जमावबंदीचा आदेश असतो. या कलमानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो, त्यावेळी हा कायदा लागू केला जातो. दंगल, हिंसाचार किंवा दंगलसदृश्‍य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हे कलम लावले जाते. त्या ठिकाणी पोलिसांकडून हे कलम लागू केले जाते. हे कलम लागू असणाऱ्या परिसरामध्ये ५ किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

SCROLL FOR NEXT