Yavatmal Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Accident News: पालकमंत्र्यांच्या गाडीची टेम्पोला धडक, अपघातानंतर वाहन उलटले; चालक गंभीर जखमी

Yavatmal Accident News: संजय राठोड यांच्या गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

संजय राठोड, अमरावती

Sanjay Rathod Accident: यवतमाळमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा कोपरा गावात मध्यरात्री दोन वाजता मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. संजय राठोड यांच्या गाडीने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला. पोहरागड इथून यवतमाळकडे पालकमंत्र्यांचा ताफा जात असताना कोपरा या गावात ही दुर्घटना घडली. पालकमंत्र्यांच्या वाहनाने मिनी अशोक लेलँडला मागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की मिनी लेलँड जागीच पलटी झाले.

या अपघातामध्ये टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला पालकमंत्र्यांच्या तात्यातील वाहनाने उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले. यावेळी टेम्पोमध्ये केळी भरलेली होती. व्यापाऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणुन रस्त्यावर पडलेली केळी दुसर्‍या वाहनात टाकुन पोहरागड इथे पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

पोहरागड इथे उद्या पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नंगारा म्युझियमचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असताना त्याचीच पाहणी करुन संजय राठोड परतत होते. पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्री संजय राठोड हे यवतमाळकडे येत असताना दिग्रस ते आर्णी मार्गावरील कोपरा या गावात अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Birthday Gift: बायकोने नवऱ्याला 5 वस्तू चुकूनही भेट देऊ नये

Maharashtra News Live Update: कर्णकर्कश डीजेविरोधात पुण्यात आणखी एका आंदोलनाचे आयोजन

Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंकडून ठाकरेंना मोठा हादरा, बड्या नेत्यासह ७ नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

Vegetable juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या या 4 भाज्यांचे ज्यूस, पोटावरची चरही मेणासारखी वितळेल

Acidity Remedies : वारंवार पित्ताचा त्रास होतोय? 'हा' १ उपाय समस्येतून करेल सुटका

SCROLL FOR NEXT