Yavatmal crime Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal crime : यवतमाळमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ३० लाख रोख रक्कमेसह १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले

Yavatmal News : घरातील महिलांवर शस्त्राने वार करीत दरोडेखोरांनी तीस लाख रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : घरात महिलाच असताना दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. महिलांना शास्त्राचा धाक दाखवत घरात असलेली ३० लाखाची राख रक्कम व माहिजवळील दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. 

यवतमाळच्या (Yavatmal) महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथून अतिदुर्गम भागात तीन किमी अंतरावर असलेल्या गोकुळवाडी येथील संतोष पांडे यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा पडला. यावेळी घरातील महिलांवर शस्त्राने वार करीत दरोडेखोरांनी तीस लाख रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे (Gold) दागिने लुटून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरली.

पोलिसांचा पाच पथक गठीत 

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आणि उमरखेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. (Robbery) दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलिसांचे वेगवेगळे पाच पथक गठीत केले असून सायबर सेलची मदत घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

SCROLL FOR NEXT