Yavatmal News Google
महाराष्ट्र

Yavatmal News: पदयात्रेतील २०० भाविकांना भोजनातून विषबाधा; यवतमाळमधील खळबळजनक घटना

Food Poisoning In Mahanubhav Panth Padayatra: यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नांदेडच्या माहूर येथून निघालेल्या महानुभाव पंथाच्या पदयात्रेतील २०० भाविकांना जेवणातून विषबाधा झाली आहे.

Rohini Gudaghe

संजय राठोड

Yavatmal News Food Poisoning To Devotess

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा निघाली. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत मोझर इथे जात होती. दरम्यान ही यात्रा चिकणी येथे पोहोचली. तेथे भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. भाविकांनी तेथे जेवण केलं. (Latest Marathi News)

जेवन झाल्यानंतर भाविकांना मळमळ-उलटीचा त्रास जाणवू लागला. जेवण झाल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडायला सुरूवात (Food Poisoning To Devotess) झाली. अनेकांना मळमळ आणि उटलीचा त्रास सुरू झाला. तातडीने भाविकांना रूग्णालयात हलविण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जेवनानंतर भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास

पदयात्रेतील दोनशे भक्तांना भोजनातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 40 जण रूग्णालयात (Food Poisoning) आहेत. अनेक रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळतेय. 18 जण यवतमाळ येथे उपचार घेत आहेत.

नांदेडच्या माहूर येथून महानुभाव पंथीयांची पदयात्रा (Mahanubhav Panth Padayatra) निघाली होती. ही पदयात्रा मार्गक्रमण करीत यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चिकणी कामठवाडा येथे पोहोचली. पद यात्रेतील भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पदयात्रेतील भक्तांचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे काहींना लगतच्या गावातील खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं.

दोनशे भाविकांना विषबाधा

मोठ्या प्रमाणात ही लक्षणे दिसू लागल्याने रुग्णांना दारव्हा उपजिल्हा रुग्णालय आणि यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं (Food Poisoning In Padayatra) आहे. राजू घाटोळ यांच्या घरी चिकने येथे पदयात्रेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. माहूर इथून मोझरमार्गे ही पदयात्रा जांभोरा येथे जाणार होती.

जेवण केल्यानंतर अनेकांना मळमळ उलटीचा त्रास होऊ लागला. 40 जणांना दारवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये नाशिक इथून पद यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा देखील समावेश (Yavatmal News) आहेत. उर्वरित 18 जणांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींनी गावातच डॉक्टरांकडून उपचार घेतला आहे. जवळपास 200 जणांना जेवणानंतर ही लक्षणे आढळून आली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

SCROLL FOR NEXT