Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनची कामे अपूर्ण; सरपंच उतरले आंदोलनात, पुष्पा स्टाईल आंदोलनाने वेधले लक्ष

Yavatmal News : अनेक गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र दोन- तीन वर्ष होऊन देखील सदर योजनेचे काम सुरु नसल्याने गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : गेल्या तीन वर्षापासून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किन्ही गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु आहे. मात्र हे काम अर्धवट असल्याने नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावं लागत आहे. हाच विषय घेऊन सदर योजना पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावच्या सरपंचाने आंदोलन पुकारले असून पुष्पा स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.   

अनेक गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र दोन- तीन वर्ष होऊन देखील सदर योजनेचे काम सुरु नसल्याने गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. अशीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही गावात पाहण्यास मिळत आहे. गावातील पाण्याच्या समस्येसाठी गावच्या कारभाऱ्याने आंदोलन पुकारले आहे. 

जलजीवन मिशनची कामे अर्धवट 

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किन्हीसह इतर गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे करण्यात आली. मात्र कंत्राटदाराकडून जल जीवन मिशनची कामे अर्धवट करण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. आता उन्हाळा सुरु झाल्याने आगामी काही दिवसात पाण्याची भीषणता अधिक जमविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे सदर योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. 

जिल्हा परिषदेसमोर साडी घालून आंदोलन 

योजनेचे काम अपूर्ण असल्याने या गंभीर विषयाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टिकोनातून किन्ही येथील सरपंच रवींद्र राठोड यांनी साडी घालून चक्क पुष्पा स्टाईलने जिल्हा परिषदेत आंदोलन केले. त्यामुळे या आंदोलनाची जिल्हा परिषद प्रशासनात मोठी चर्चा होत आहे. जोपर्यंत कामे सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा सरपंच रवींद्र राठोड यांनी दिला आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT