Shruti Vilas Kadam
साधा आणि एलिगंट लूक हवा असेल तर स्ट्रेट पलाझो उत्तम पर्याय आहे. कुर्ती, शॉर्ट कुर्ती किंवा टॉपसोबत सहज मॅच होतो.
रुंद घेर असलेला फ्लेअर्ड पलाझो सण, समारंभ किंवा पार्टीसाठी आकर्षक दिसतो. हा डिझाइन चालताना सुंदर लूक देतो.
फ्लोरल, ब्लॉक प्रिंट किंवा जिओमेट्रिक प्रिंट असलेले पलाझो कॅज्युअल आउटिंग आणि डे-वेअरसाठी योग्य ठरतात.
हाय-वेस्ट पलाझोमुळे उंची अधिक उठून दिसते. क्रॉप टॉप, शर्ट किंवा फिटेड कुर्तीसोबत हा डिझाइन छान दिसतो.
प्लिटेड डिझाइनमुळे आउटफिटला रॉयल आणि मॉडर्न लूक मिळतो. ऑफिस किंवा फॉर्मल कार्यक्रमासाठीही हा उत्तम पर्याय आहे.
चिकनकारी, गोटा पट्टी किंवा धाग्याच्या नक्षीकामाने सजवलेले पलाझो लग्नसमारंभ, सण आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी खास लूक देतात.
पावसाळ्यात आरामदायी फॅशनसाठी कॉटन पलाझो सर्वोत्तम पर्याय आहे. हे दिवसभर आरामदायी वाटते आणि दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते.