Yavatmal Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Water Scarcity : टंचाईच्या झळा; यवतमाळ जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांत ३१ टक्के जलसाठा

Yavatmal News : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भूजल पातळीत चांगलीच वाढली होती. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्प चांगल्या प्रकारे भरले होते. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली होती

Rajesh Sonwane

यवतमाळ : उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच पाण्याची भीषणता देखील तितकीच वाढत आहे. आतापर्यंत जाणवत असलेली पाण्याची टंचाई आता अधिक गडद होत चालली असून यवतमाळ जिल्ह्यात देखील टंचाईच्या झळा तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. कारण जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्पात आता ३०.६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामुळे अनेक भागात टंचाईने डोके वर काढले असून पुढील एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भूजल पातळीत चांगलीच वाढली होती. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्प चांगल्या प्रकारे भरले होते. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटली होती. यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईच्या झळा अधिक जाणवणार नाही; असे चित्र असताना वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे यंदा देखील पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात केवळ ३०.६९ टक्के पाणीसाठा 

यवतमाळ जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली आहे. तर सद्यस्थितीला जिल्ह्यातील ७५ प्रकल्पात ३०.६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या तीव्र झळा वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. परिणामी पाणी साठ्यात देखील घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी एक महिना जेमतेम पाणी पुरेल असे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळत आहे. 

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 

जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पामध्ये बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे. त्यात प्रामुख्याने अडाण प्रकल्पात ४५.७५ टक्के, नवरगाव १२.५०, गोकी ४१.२१, वाघाडी ४१.१८, सायखेडा ३८.१५, लोअर पूस ४२.६४, बोरगाव २७.८४ टक्के असे मिळून ३०.६९ टक्के जलसाठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT