Yavatmal Earthquake: 3.0 Magnitude Tremors Shake Kalamb Village saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Earthquake: ऐन दुपारी जमीन हादरली, घरांच्या भिंती थरथरल्या! भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांची धावपळ

Yavatmal Earthquake : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे दुपारी तीनच्या सुमारास ३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. घरांच्या भिंती थरथरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली. सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Bharat Jadhav

  • यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे भूकंपाची नोंद

  • भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी होती.

  • दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

संजय राठोड,साम प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. गावात पहिल्यांदाच भूकंपाचे हादरे जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणावले. त्यानंतर नागरिक भीतीने सैरवैर पळू लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे ३.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे. या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एकलासपूर परिसरात पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भिलपुरी गावात दाखल; शेतकरी कुटुंबासोबत साजरी करणार दिवाळी

Diwali Padwa Gift For Wife: दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोसाठी खरेदी करा लेटेस्ट डिझाईन्सच्या साड्या, 5 न्यू पॅटर्न्स

Gold vs Silver Investment: सोने की चांदी? १ लाखांच्या गुंतवणुकीवर कोण बनलं पैशांचं मशीन? आकडे पाहून बसेल धक्का

KDMC : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या; ठाकरे गटाचे महापालिका मुख्यालयासमोर ढोलताशा आंदोलन

Bathroom Hygiene: बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवावा की बंद? तुमची 1 सवय पडू शकते महागात, वाचा नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT