पुनर्वसनमंत्र्यांच्या पत्राला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली संजय राठोड
महाराष्ट्र

पुनर्वसनमंत्र्यांच्या पत्राला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली

पुनर्वसन मोबदल्यासाठी अमडापूर प्रकल्प बाधितांचे तीन दिवसांपासून उपोषण सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - उमरखेड Umerkhed तालुक्यातील कुरळी Kurali येथील ३५ पुरूष आणि ३५ महिला यवतमाळ Yavatmal येथील आझाद मैदानावर Azad Maidan गेल्या तीन दिवसांपासून पुनर्वसन मोबदलाच्या मागणी साठी आमरण उपोषणला बसले आहेत. मात्र उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाने त्यांची साधी दखलही घेतली नाही. ३५ महिलांचा उपोषणात सहभाग असताना पोलीस तर सोडाच एकाही जबाबदार अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही.

उमरखेड तालुक्यातील कुरळी येथील शेतकऱ्यांनी अमडापूर प्रकल्पाला १९९४ साली घरे व शेतजमीन दिली.त्यादरम प्रकल्पाल बाधितांना शेतीचा मोबदला अत्यल्प मिळाला. कुरळी येथील ३४० कुटूंबांच्या पुनर्वसनासाठी महागांव येथे १२ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली. परंतू २४ हेक्टर जमीनीची गरज होती त्यामुळे पुनर्वसनाचा प्रस्ताव बारगळला.

हे देखील पहा -

पुनर्वसनासाठी खर्च भरपुर येणार असल्याने शासनाने स्वेच्छा पुनर्वसनाचा प्रस्ताव लघु पाटबंधारे विभाग पुसद येथील अधिकाऱ्यांना २०१९ साली प्रक्लपग्रस्तांसमोर ठेवला. प्रकल्पग्रस्तांनी स्वेच्छा पुनर्वसनासाठी मान्यता दिली परंतू ठराविक कालावधीत पुनर्वसन करण्यात आले नाही. प्रशासनाने तारीख पे तारीख दिल्या त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नाईलाजाने यवतमाळ येथील आझाद मैदानावर दि.९ ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

शांततेच्या मार्गाने आपले हक्क मिळविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधी प्रदान केला आहे. जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती उपोषणाला बसतो, प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. मत मागणारे नेते ढुंकूनही पाहत नाही.अशीच काही अवस्था अमडापूर येथील प्रक्लप बाधितांची झाली आहे.

आझाद मैदानावर मोठ्या संख्येने महिला वर्ग उपोषणला बसल्या आहेत. मात्र त्याठिकाणी फिरते शौचालय, पिण्याचे पाणी, रात्री लाईट ची व्यवस्था आदी मूलभूत सुविधाही त्यांना पुरविण्यात आलेल्या नाही त्यामुळे उपोषणकर्त्या महिलांची मोठी कुचंबणा होताना दिसते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT