कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील (In Kalyan rural assembly constituency) १४ गावांमध्ये असलेल्या गोसिया मार्केट मधून आणि मुंब्रा-पनवेल मार्गावरील (Mumbra - Panvel Highway) भंगारवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रित पाणी (Chemical mixed water) थेट रस्त्यावर सोडले जात आहे. त्यामुळे रस्त्यांना देखील निळा, काळा रंग आला आहे. तर शेतकऱ्यांच्या (farmers) शेतात देखील केमिकल मिश्रित पाणी गेल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत आता मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांना ट्विट केले आहे. (Chemical mixed water infiltrated in the fields of farmers in rural Kalyan)
हे देखील पहा -
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना या केमीकलयुक्त पाण्याचा व्हिडीओ शेअर करत ट्विट केले की, ''कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पिंपरी ग्रामपंचायत हद्दीतील गोसिया मार्केट मधील गोदामामुळे मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .संबंधितांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नाही.''
कल्याण ग्रामीण विधनासभा क्षेत्रातील पिंपरी ग्रामपंचायत (Pimpari Grampanchayat) हद्दीतील गोसिया मार्केट मधील गोदामामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण होत आहे. तसेच मुंब्रा-पनवेल मार्गावरील भंगारवाल्याकडून (Debris) पण मोठ्या प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. केमिकल मिश्रित रसायन हे रस्त्यांवर आणि नाल्यांवर सोडले जात आहे. त्यामुळे १४ गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नद्यांमध्ये आणि नाल्यांमध्ये असलेले मासेदेखील मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळून आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच या प्रदूषणामुळे १४ गावांमध्ये असलेल्या बोरवेलचे पाणी तसेच विहिरींचे पाणी देखील आता प्रदूषित (water pollution) होत आहे.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (Pollution Control Corporation) अधिकारी काय करतात असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या परिसरातील ग्रामस्थ हे सध्या संतापले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे चिटणीस ज्ञानेश्वर यंदारकर यांनी सांगितले की गोसिया मार्केट मधून केमिकल सोडले जाते. गेल्या आठ वर्षांपासून हे सुरु आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.