Yavtmal District Central Bank Election 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Bank Election 2026 : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जाहीर, RBIच्या निर्देशांमुळे जुने संचालक अडचणीत; वाचा सविस्तर

Yavtmal District Central Bank Election 2026 News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून RBIच्या निर्देशांनुसार सलग १० वर्षे संचालक राहणाऱ्यांवर निवडणूक बंदीची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

  • RBIच्या निर्देशांनुसार सलग १० वर्षे संचालकांवर बंदी

  • निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल

  • २२ जानेवारी रोजी प्रकरणाची सुनावणी होणार

संजय राठोड, यवतमाळ

राज्यात नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर लगेचच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशातच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूका देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अशातच जिल्हा बँकेत अनेक वर्षांपासून सलग संचालक म्हणून निवडून येणाऱ्यांवर निवडणूक बंदीची टांगती तलवार आली आहे.

आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे सलग १० वर्षे संचालक राहणाऱ्यांना निवडणूक लढविण्याची बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशाविरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २१ पैकी ११ संचालक सातत्याने निवडून आले आहेत. ठरावीक मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याने तेथून ते बँकेत कायम राहिले आहेत.

आता अशा संचालकांच्या बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निकष घालून दिले आहेत. त्यासाठी २०२० मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दहा वर्षे संचालक म्हणून निवडून येणाऱ्यांना आता निवडणूक लढता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग निवडून येणाऱ्या संचालकांना जबर धक्का बसला आहे. त्यांना स्वतःच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला किंवा सहकाऱ्याला संधी देण्याची वेळ ओढवली आहे. या निर्णयाच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरबीआयचे निर्देश पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्या संचालकांनी केलेली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीत शेतकऱ्यांचा एल्गार

Skin Care Tips : स्वस्तात मस्त टोमॅटो करेल १० मिनिटांत टॅनिंग दूर, तुम्ही महागडे स्कीन प्रोडक्ट फेकून द्याल

Nath Blouse Design: नथीच्या डिझाईनमध्ये ब्लाऊजचे 5 प्रकार, मराठमोळा लूकवर शोभून दिसेल

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील मुख्य रस्ते बुधवारी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Vande Bharat Express : महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत मिळणार? परळीकरांचे थेट रेल्वे विभागाला पत्र

SCROLL FOR NEXT