Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Court : प्रियकराच्या मदतीने आईने केली मुलाची हत्या; दोघांना जन्मठेपची शिक्षा

Yavatmal News : प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने पोटच्या मुलाला संपविल्याच्या घटना यवतमाळ जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती, या घटनेप्रकरणी आईसह तिच्या प्रियकराला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: प्रेमात आकांत बुडालेल्या निदर्यी आईने प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या केली होती. यानंतर त्याचा मृतदेह स्मशानभूमीत फेकून दिला होता. हा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पाच वर्षानंतर मुलाचा खून करणाऱ्या आईसह प्रियकराला यवतमाळ जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. नरेंद्र ढेंगाळे आणि शोभा चव्हाण असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.  

यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी सुनावणीनंतर शिक्षा सुनावली आहे. दरम्यान यवतमाळच्या नेर तालुक्यातील मोझर येथे कमल चव्हाण हा ३ ऑगस्ट २०२० ला रात्री आठ वाजताच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. मात्र तो परत घरी आला नाही, तर दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता जावयाने नेर पोलीस ठाणे गाठून कमल चव्हाण समशानभूमीत पडून असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी समशानभूमी गाठून पाहिणी केली असता त्याच्या गळ्यावर तसेच चेहऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याचे उघडकीस आले होते.  

पोलीस तपासात सत्य आले समोर 

मृताची आई यांनी नेर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्या विरोधात तक्रार देण्यात आली होती. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. पाच दिवसाच्या तपासानंतर प्रत्यक्षदर्शी पंकज कावरे याला संशयाच्या कारणातून पोलिसांनी विचारपूस केली असता मृताची आई शोभा चव्हाण आणि प्रियकर नरेंद्र ढेंगाळे या दोघांनी संगणमत करून कमल याला राहत्या घरात जीवानिशी ठार मारून गावातील समशानभूमीत नेऊन टाकल्याची कबुली दिली होती. 

पाच वर्षानंतर कोर्टाचा निर्णय 

पोलीस समोर आरोपींनी दिले त्यावरून पोलिसांनी दोघांनाही 10 ऑगस्ट 2020 ला अटक केली घरातील लोखंडी सराट्याने त्याला ठार मारल्याची कबुली दोन्हीही आरोपींनी पोलिसांना दिली. यानंतर दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान या घटनेप्रकरणी मागील पाच वर्षांपासून सुनावणी सुरु असताना जिल्हा सत्र न्यायालयाकडून अंतिम निर्णय देत दोघा आरोपीना जन्मठेप सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : मध्यरात्री घरात घुसला, तलवारीच्या धाकात अल्पवयीन तरुणीला पळवलं, अन्... नागपुरात भयकंर घडलं!

Sambhajinagar : पाय घसरल्याने नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; नदीकाठी जनावरे चारताना दुर्दैवी घटना

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग आत्ताच जाणून घ्या

GK: कोणत्या देशात Gen Z ची सर्वाधिक लोकसंख्या आहे? जाणून घ्या आकडेवारी

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT