Maharashtra Congress leader joins Eknath Shinde camp saam tv
महाराष्ट्र

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

Yavatmal Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आर्णी नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष अनिल आडे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षात असताना त्यांच्यात असलेल्या नाराजीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू चर्चा सुर होत्या.

Bharat Jadhav

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल आडे यांनी पक्षाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला.

  • मुंबईत मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.

संजय राठोड, साम प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेते अनिल आडे पक्षात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.काँग्रेस सोडणार असे देखील राजकीयवर्तुळात चर्चा सुरू असताना अखेर आर्णी पालिकेचे पहिले नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे यांनी काँग्रेसला 'रामराम' ठोकत मंत्री दादा भुसे,मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात मुंबईत शिंदेसेनेत जाहिर पक्ष प्रवेश केला.

काँग्रेसचे दिवंगत लोकनेते रामजीभाऊ आडे यांनी काँग्रेसमध्ये आयुष्य खर्च केलं.रामजीभाऊंनी कायम कार्यकर्ते मोठे केले,त्यांना जपलं मात्र त्यांच्याच मुलाला कॉग्रेस का सोडावी वाटली? काँग्रेस सोडण्यास कोणी भाग पाडल, अशी उलटसुलट चर्चा या निमित्याने सुरू आहे.यवतमाळच्या आर्णी तालुक्यात माजी नगराध्यक्ष आणि बाजार समितीचे सभापती अनिल आडे यांचा मोठा नेटवर्क आहेत. अनिल आडेंच्या अर्धांगिनी ह्या बंजारा समाजाच्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या महिला अध्यक्ष राहिल्या आहेत.त्यामुळे काॅग्रेसने सगळ काही दिले असताना अनिल आडे यांनी काँग्रेस सोडली का अशा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारल्या जात आहे.

माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे आणि दिवंगत लोकनेते रामजीभाऊ आडे यांची मैत्री सर्वांनी बघितली.अनेक वेळा मोघे विरूद्ध आडे असा संषर्घ देखील झाला.मात्र ते दोघेही काॅग्रेसच्या झेंड्याखाली कायम पक्षासाठी उभे राहिले.मात्र लोकसभा निवडणुकीपासून अनिल आडे यांना पक्षात अपमाजनक वागणूक दिल्या जात असल्याची ओरड होत होती.अनेक वेळा पक्षाच्या कार्यक्रामातून वगळणे,अपमानित करणे असे प्रकार घडत असल्याने अनिल आडे आणि त्यांचा समर्थक नाराज होता.त्यामुळे नाईलाजास्तव काँग्रेसला रामराम ठोकून शिंदेसेनेत पक्ष प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहे.

अनिल आडे यांच्यामुळे काँग्रेस बसणार फटका?

अनिल रामजी आडे यांना आर्णी तालुक्यात मानणारा एक मोठा वर्ग आहे.तालुक्यात चार जिल्हा परिषद सर्कल आणि आठ पंचायत समिती गण आहेत.यामध्ये बोरगांव-भंडारी हा जिल्हा परिषद सर्कल अनिल आडे यांचा आहेत.याच सर्कलमधून दिवंगत लोकनेते रामजीभाऊ आडेंनी बोरगांव या जिल्हा परिषद सर्कल मधून राजकीय कारकीर्द सुरू केली.

विशेष म्हणजे अनिल आडे यांच्या अर्धांगिनी माधुरी आडे यांनी याचं सर्कलमधून निवडून येत काॅग्रेसने त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष केलं होतं.त्यामुळे काॅग्रेसच्या लिस्ट मधून सध्या तरी एक सर्कल आणि दोन गण गेल्याचे बोलल्या जात आहेत.उर्वरित तीन सर्कल आणि सहा गणावर अनिल आडेंना शिंदे सेनेने मोकळ सोडल्यास तिथेही चांगली कामगिरी करू शकतात.

काँग्रेसमध्ये अनिल आडेंची जागा कोण घेणार?

सभापती आणि माजी नगराध्यक्ष आणि आडे यांनी काँग्रेस सोडून शिंदेसेनेत दाखल झाल्यानंतर आर्णी तालुक्यात काँग्रेसमध्ये नेता कोण उरलाय? अनिल आडेंची जागा कोण घेणार? असे प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

SCROLL FOR NEXT