Thackeray faction faces setback — 13 leaders, including district chief, sent to jail till October 17 in Yavatmal. saamtv
महाराष्ट्र

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Yavatmal Thackeray Faction Leaders: आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवल्या प्रकरणी पोलीसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांवर अटक करण्यात आली होती. न्यायालयाने या पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

Bharat Jadhav

  • यवतमाळमध्ये ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आलीय.

  • वणी आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता.

  • गंभीर गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं.

संजय राठोड, साम प्रतिनिधी

वणी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह 13 जणांना 17 ऑक्टोबरपर्यंत एमसीआर, जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलीय. वाशिमचे खासदार आणि वणीचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन देखील दिले. मात्र वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत 13 पदाधिकाऱ्यांची कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

वणीचे आमदार यांच्या नेतृत्वात काल रात्री ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सोडण्याच्या मागणीसाठी दोन तास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केलीय.

काय आहे प्रकरण?

राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री प्रा. अशोक उइके वणी येथे गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. नुसता आढावा कसला घेता,ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. सोयाबीनला हमीभाव द्या अशा मागण्या करत शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. उईके यांचा ताफा अडवल्या प्रकरणी न्यायालायने त्यांना शिक्षा सुनावली.

आदिवासी विकासमंत्री उइके यांचा नियोजित दौरा होता. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार होते. मात्र केवळ बैठकांचा फार्स कशाला असा सवाल शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा निषेध मोर्चा केला. मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.

शिवसैनिकांनी उइके यांच्या गाडीसमोर लोटांगण घातलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसैनिकांनी गनिमी काव्याने काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

Aadhar Card : आधार कार्डवर नाव कसे अपडेट करायचे? जाणून घ्या

Winter Skincare Tips: डल आणि ड्राय स्किनला करा बाय; बस 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो आणि मिळवा नॅचरल विंटर ग्लो

Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जाग

Hair Care: केस खूप गळतायेत, कोरडे आणि पांढरे होतायेत? मग हा १ पदार्थ ठरेल बेस्ट, होतील दाट आणि चमकदार केस

SCROLL FOR NEXT