Dhule News Saam Tv
महाराष्ट्र

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Dhule News : धुळेतील नामांकित मॉलमधून विकत घेतलेल्या बिस्किटाच्या पॅकेटमध्ये बुरशी आणि आळ्या सापडल्या. ग्राहक अनिकेत बिरारी यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Alisha Khedekar

  • धुळेतील नामांकित मॉलमध्ये विक्रीस ठेवलेल्या बिस्किटात आळ्या आढळल्या.

  • ग्राहक अनिकेत बिरारी यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली.

  • खराब बिस्किटामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत.

  • पालकांना मुलांना बिस्किट देण्यापूर्वी नीट तपासून देण्याचे आवाहन.

तुम्ही जर तुमच्या चिमुकल्यांना बिस्किट खाऊ घालत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. धुळ्यात एका मोठ्या नामांकित मॉल मधून ग्राहकाने विकत घेतलेल्या बिस्किटात चक्क आळया निघाल्या आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यात नामांकित मॉल मधून अनिकेत बिरारी असे या ग्राहकाने बिस्कीट विकत घेतलं. अनिकेत बिरारी यांनी घरी गेल्यानंतर तो बिस्किट उघडलं. त्यानंतर त्या बिस्किटाला बुरशी लागल्याचे आणि आळ्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी या संदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली आहे.

या तक्रारीनंतर ग्राहकांमध्ये आरोग्य सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या बिस्किटांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात आता प्रशासन पुढील काय कारवाई करेल हे बघणं आवश्यक ठरणार आहे. दरम्यान या घटनेने प्रशासनाला आणि पालकवर्गाला सतर्क केले आहे.

परंतु तुम्ही जर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना बिस्किट खायला देत असाल तर आपण देखील त्या बिस्किटात आळया तर नाहीत ना याची खात्री करा आणि मगच आपल्या मुलांना ते बिस्किट खायला द्या.ग्राहकांनी वस्तू घेण्याआधी खात्री बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT