women morcha for water in mohol saam tv
महाराष्ट्र

Mohol News : सीना नदीतून माेहाेळ शहराला पाणी सोडा; महिलांचा पालिकेवर लाठणं माेर्चा

mohol nagarparishad : झोपेचं सोंग घेणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी महिलांनी आज मोर्चा काढला. यावेळी महिलांकडून पाणी देण्याची मागणी करण्यात आली.

विश्वभूषण लिमये

Solapur :

सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवू लागली आहे. बहुतांश तालुक्यात पाण्याअभावी शेती काेरडी पडू लागली आहे. यामुळे शेतकरी (farmers) त्रस्त आहेत. सीना नदीतून मोहोळ शहरासाठी पाणी सोडावे या मागणीसाठी आज (साेमवार) माेहाेळ (mohol) येथे महिलांनी मोर्चा काढला. यावेळी महिलांनी लाठणं (बेलनं) माेर्चाचे देखील आयाेजन केले हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवा आणि घरकुल योजनेचा हप्ता लाभार्थ्यांना मिळावा या मागणीसाठी महिलांनी मोहोळ नगरपरिषदेवर ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने बेलनं मोर्चा काढला. या माेर्चात माेठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या हाेत्या.

यापूर्वी महिलांनी घागर मोर्चा काढला हाेता. तरी देखील काेणताच मार्ग निघाला नाही. त्यामुळे झोपेचं सोंग घेणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी महिलांनी आज बेलनं मोर्चा काढला. यावेळी महिलांकडून पाणी देण्याची मागणी करण्यात आली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT