women beats liquor store owner saam tv
महाराष्ट्र

Satara News: व्हय रं भा.... आमच्या संसाराची राख करताेयस व्हय, विक्रेत्याला चाेप, महिलांकडून दारु अड्डा उध्वस्त

Women beats liquor store owner: यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एकास महिलांनी चाेपले.

ओंकार कदम

Satara News : कोरेगाव (koregoan) तालुक्यातील भाडळे चौकातील दारू (liquor) अड्डा महिलांनी उध्वस्त केला. चिलेवाडी गावातील रणरागिणींनी आक्रमक हाेत दारू विक्रेत्याला चोप दिला. यावेळी आक्रमक महिलांपुढे (women) दारु विक्रेत्याने हाता पाया पडून पुन्हा दारु विक्री करणार नाही असे म्हणत कशीबशी सुटका करुन घेतली.

साताऱ्यातील (satara) भाडळे खोऱ्यामध्ये चिलेवाडी भाडळे मध्यवर्ती चौकात मागील वर्षभरापासून एका पत्र्याच्या शेड मध्ये वडापाव विक्री करण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्री सुरू होती. यामुळे परिसरातील भाडळे, चिलेवाडी, नागेवाडी, हासेवाडी, बोधेवाडी, धनगरवाडी या गावातील ज्येष्ठांबरोबर युवा (youth) वर्ग व्यसनाच्या आहारी गेला.

या अनधिकृत दारू अड्डयाची माहिती चिलेवाडी येथील महिलांना मिळाली. गावातील सर्व महिला एकत्र झाल्या. त्यांनी थेट भाडळे चौक गाठला. तेथील दारु अड्ड्यावर महिलांनी हल्ला चढवला. शेडमधील सर्व दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एकास महिलांनी चाेपले. महिलांचा रागरंग पाहून दारू विक्रेत्याने चुकलं माझं पुन्हा नाय असं करणार असे गयावया करीत माफी मागत आपली सुटका करुन घेतली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

Leopard Attack : धक्कदायक! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, जबड्यात पकडलं अन्...

Winter Hairfall : हिवाळ्यात केस लवकर का गळतात? जाणून घ्या कारण

अजित पवार गटाकडून काँग्रेसला जबरी धक्का; ज्येष्ठ नेत्याचा रामराम, ४० वर्षांची सोडली साथ

Breast cancer screening: ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी फक्त मॅमोग्राफी पुरेशी नाही? डॉक्टरांनी सांगितली दुसरी पद्धत

SCROLL FOR NEXT