Aurangabad Train  Saam Tv
महाराष्ट्र

रेल्वे रुळावर अडकला महिलेचा पाय तेवढ्यात आली ट्रेन अन्...

त्या महिलेच्या अंगावरुन इंजिन आणि तीन डब्बे गेले होते.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) येथील मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वेरुळ ओलांडत असताना रेल्वेच्या पटरीवर एक महिला पाय अडकून रुळावर मध्येच अडकल्याची घटना समोर आली. ही महिला अडकली असता एवढ्यात एक रेल्वे समोरुन आली ती महिला रेल्वे (Train) रुळावर मधोमध झोपली. यावेळी त्या महिलेच्या अंगावरुन इंजिन आणि तीन डब्बे गेले होते. हे पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. रेल्वे वेळीच थांबवल्याने त्या महिलेचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, वेळ आली होती पण काळ आला नव्हता, अशीच ही घटना घडली. एक महिला रेल्वे पटरी ओलांडत असताना रेल्वे (Train) पटरीच्या मधोमध असलेल्या लोखंडी क्लिपमध्ये पाय अडकून पडली. पटरीवरून तिला हालताही आले नाही. त्याचवेळी रेल्वे आली, पण ती बचावली.

हा थरार कॅमेऱ्यामध्ये (Camera) कैद झाला आहे. रेल्वेच्या लोकोपायलटमुळे तिचे प्राण वाचले आहेत. औरंगाबादच्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना घडली आहे. जालनाहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी रेल्वे निघाली होती. यावेळी ही महिला रेल्वे लाईन क्रॉस करीत होती, आणि त्याच दरम्यान पटरीमध्ये पाय अडकून खाली पडली.

हे रेल्वे लोकोपायलटच्या लक्षात आल्याने त्याने जोरात हॉर्न वाजवले. पण ती महिला उठू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वेचा इमर्जन्सी ब्रेक लावून रेल्वे स्लो करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती महिला पटरीच्या मधोमध ती पडून राहिली. ब्रेक धरल्यानंतर चार डब्बे वरून पुढं गेले आणि गाडी थांबली. पण सुदैवाने ती महिला वाचली. विशेष म्हणजे या महिलेला कोणतीच जखम झाली नाही. घाबरलेल्या महिलेला धीर देत तिला घरी पाठवण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे १५ मिनिट लेट झाली. या महिलेला सुखरुप बाहेर काढल्यानंतर रेल्वे औरंगाबादकडे निघाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Hegde: कांजिवरम साडीत खुललं पूजा हेगडेचं सौंदर्य, फोटो पाहताच मन झालं घायाळ

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Genelia Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंचा स्वॅग भारी!

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

SCROLL FOR NEXT