वर्धा: वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादी वकिलावर न्यायाधीशांपुढेच चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेत फिर्यादी महिला वकील जखमी झाली आहे. तर, हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, न्यायालयात न्यायाधीशांपुढे सुनावणी दरम्यान झालेल्या या घटनेने न्यायालय परिसरात खळबळ माजली (Woman attacked in front of judge in Wardha District Sessions Court).
नेमकं काय घडलं?
आशुतोष करमकर प्रमुख वर्धा (Wardha) जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात साक्ष पुरावा सादर करण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी 307 च्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेला आरोपी भीम गोविंद पाटील (83) हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. न्यायालयाचे (Court) कामकाज सुरु होते.
यादरम्यान 307 च्या गुन्ह्यातील फिर्यादी वकील योगिता रमेशराव मून यांची पुलगाव गाव घटनेतील साक्षी पुरावा प्रकरणी साक्ष सुरु होती. यावेळी आरोपीने मागून येऊन मून यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे न्यायालयात खळबळ उडाली.
आरोपीने मागून फिर्यादी महिला वकिलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचे केस धरून डोक्यावर तिच्या धारदार शस्त्राने सपासप वार (Attack) केले. न्याधीशांच्या सोमोरच धारदार शास्त्राने हल्ला केला. पोलिसांनी (Police) तात्काळ आरोपीला ताब्यात घेत धारदार शस्त्र हिसकावून वकील महिलेचा बचाव केला. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सेवाग्राम रुग्णालयात (Sevagram Hospital) उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तर, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Edited By - Nupur Uppal
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.