सेल्समन ची नजर चुकवून दोन वेळा दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

सेल्समन ची नजर चुकवून दोन वेळा दागिन्यांची चोरी करणारी महिला जेरबंद!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- मंगेश मोहिते

नागपूर : सराफा दुकानात दिवाळीच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत सेल्समन ची नजर चुकवत दुकानातून दोनदा सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिलेला CCTV च्या माध्यमातून तहसील पोलिसांनी ताब्यात घेत चोरीच्या सामानाची जप्ती केली आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील सराफा व्यापाऱ्यांच्या शो रूम मध्ये चेहऱ्याला कपडा बांधून महिला खरेदीला आली.

हे देखील पहा :

मंगळसूत्र खरेदीसाठी आल्याचं सांगून वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र ची डिझाइन पाहत असताना सेल्समन ची नजर चुकवत 34 ग्राम वजनाचा मंगळसूत्र हाथसफाईने गायब केलं. याची तक्रार तहसील पोलीस स्टेशन ला दाखल झाली पोलीस आरोपीचा शोध घेत असताना त्याच दुकानात संशयास्पद महिला खरेदीसाठी आल्याची माहिती शो रूम मालकाने पोलिसांना दिली.

पोलिसांनी CCTV च्या माध्यमातून महिलेची ओळख पटवीत तिला ताब्यात घेतलं. महिलेने चोरीची सुरुवातीला कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी आपला हिसका दाखवताच चोरीचे सामान नवऱ्याकडे लपविल्याच तिने सांगितलं. पोलिसांनी चोरीचे सामान चोरीसाठी वापरलेली मोटार सायकल असा एकूण 3 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपी नागपुरातील एका मोठय़ा हॉटेल मध्ये नोकरी करत असून, नोकरी गेल्यानंतर त्यांनी हा प्रकार सुरु केल्याच, तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन येडगे यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT