Shivaji Maharaj Saam TV
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari: समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारणार? - राज्यपाल (पहा Video)

'चाणक्य के बिना चंद्रगुप्त कौण पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौण पुछेगा'

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. ते आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं.

ते भाषणात म्हणाले, ' आज मराठी भाषा गौरव दिवस आहे, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. राम मंदिर (Ram Mandir) कार्यक्रम सुरू असताना मला समर्थ रामदासांचे (Samarth Ramdas) नाव आठवत होते वेळोवेळी देशात संतांचे कार्य दिसले आहे. शक्तीची सर्वत्र पूजा होते, माजी आमदार, खासदारांना कोणी विचारत नाहीत असं वक्तव्य त्यांनी शक्तीचे महत्व समजवताना केलं आहे.

पहा व्हिडीओ -

तसंच शक्ती सर्वकाही आहे, त्यामुळे शक्तीची आराधना केली जाते आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरु मिळाला तो यशस्वी होतो, जसं चाणक्य नसते तर चंद्रगुप्त नसते तसंच जर समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसंच प्रत्येक ठिकाणी गुरुचे महत्त्व मोठे आहे. आपणाला समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे, तसंच संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल असल्याचंही भगतसिंग कोश्यारी म्हणाले.

दरम्यान, 'राजा-महाराजा चक्रवर्ती सब, चाणक्य के बिना चंद्रगुप्त कौण पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौण पुछेगा, मै शिवाजी और चंद्रगुप्त का छोटा नही बता रहा, लेकीन गुरू का स्थान बडा होता है.'

मात्र यावेळी त्यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) कमी लेखत नसल्याचही सांगितलं. शिवाय शिवाजी महाराजच समर्थांना म्हणाले होते, 'तुमच्या आशिर्वादाने राज्य मिळालं' असही राज्यपाल म्हणाले. तसंच गुरुदक्षिणा म्हणून राज्याची चावी आपल्याजवळ देतो असही महाराज म्हणाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

Shahi Tukda Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा,वाचा सोपी रेसिपी

Mug Cleaning Tips: बाथरुममध्ये वापरला जाणारा मग किती दिवसांनी बदलावा? डाग काढण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT