Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

Shreya Maskar

डाळ तडका

डाळ तडका रेसिपी बनवण्यासाठी चणा डाळ, हळद, तूप किंवा तेल, जिरे, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, हिंग, मीठ आणि सुक्या लाल मिरच्या इत्यादी साहित्य लागते.

Dal Tadka | pinterest

चणा डाळ

ढाबा स्टाईल डाळ तडका बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून घेऊन जवळपास ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंतर प्रेशर कुकरमध्ये डाळ, हळद, मीठ आणि पुरेसे पाणी घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.

Chana Dal | pinterest

आले-लसूण पेस्ट

आता एका मोठ्या कढईत तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे, हिंग घालून चांगले तडतडू द्या. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या, आले-लसूण पेस्ट घालून चांगले मिक्स करा.

Ginger-Garlic Paste | pinterest

कांदा-टोमॅटो

त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून गोल्डन फ्राय करा. चिरलेले टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर धणेपूड, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मसाले चांगले परतून घ्या.

Onion-Tomato | pinterest

कोथिंबीर

आता उकडलेली चणा डाळ घालून चांगले मिसळा. डाळीत मसाले मुरण्यासाठी मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवा. शेवटी वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घाला.

Coriander | pinterest

जिरा राइस-डाळ तडका

अशाप्रकारे ढाबा स्टाईल डाळ तडका तयार आहे. तुम्ही तंदुरी रोटी, पराठे, जिरे भात किंवा साध्या भातासोबत सर्व्ह करा.

Jeera Rice & Dal Tadka | pinterest

टीप १

फोडणीसाठी नेहमी तुपाचा वापर करा, ज्यामुळे डाळीला ढाब्यासारखी चव येते. मसाले चांगले भाजून घ्या, ज्यामुळे डाळीचा स्वाद आणि सुगंध वाढतो.

Tip 1 | pinterest

टीप २

डाळ आधी भिजवल्याने ती लवकर शिजते आणि तिची चवही चांगली लागते. डाळ खूप घट्ट झाल्यास, आपल्या आवडीनुसार पातळ करण्यासाठी थोडे गरम पाणी घाला.

Tip 2 | pinterest

NEXT : पावसाळ्यात घरीच बनवा थिएटरसारखे मसाला पॉपकॉर्न, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

Masala Popcorn Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...