Shreya Maskar
पावसाळ्यात काहीतरी चटपटीत पण हलके खायचे असेल तर फक्त १०-१५ मिनिटांत घरीच मसाला पॉपकॉर्न बनवा. सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या.
मसाला पॉपकॉर्न बनवण्यासाठी मक्याचे दाणे, बटर, हळद, लाल मिरची पूड, चाट मसाला, काळी मिरी पूड, मीठ , चीज , पेरी पेरी मसाला इत्यादी साहित्य लागते.
मसाला पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात बाजारातून विकत आणलेले मक्याचे दाणे घाला.
मक्याचे दाणे मंद आचेवर चांगले शिजू द्या. काही मिनिटांतच दाणे फुटून पॉपकॉर्न तयार होतील.
आता तयार पॉपकॉर्न एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात हळद, लाल मिरची पूड, चाट मसाला, काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व चांगले मिक्स करून घ्या.
तुम्हाला पॉपकॉर्नची चव आणखी वाढवायची असेल तर त्यात पेरी पेरी मसाला देखील टाकू शकता. त्यानंतर अजून तुम्ही यात चीज स्लाइस देखील टाकू शकता. मात्र चीज मका शिजवताना टाकावे.
अशाप्रकारे थिएटरला मिळतात तसे चटपटीत मसाला पॉपकॉर्न तयार झाले आहे. आता मस्त घरीच एखादा चित्रपट लावा आणि पॉपकॉर्नचा आनंद घ्या.
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ टाळा. कारण बाहेरच्या उघड्या पदार्थांमुळे पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवतात.