Shreya Maskar
उरलेल्या इडलीचे पकोडे / भजी बनवण्यासाठी इडल्या, बेसन, तांदळाचे पीठ किंवा मैदा, लाल तिखट, जिरे पूड, हिरव्या मिरच्या, हिंग, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या इडलीचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम इडलीचे चार तुकडे करा. तसेच तुम्ही आवडत्या आकारातही इडली कापू शकता.
त्यानंतर एका मोठ्या भांड्यात बेसन, मैदा किंवा तांदळाच्या पीठ टाकून त्यात हळूहळू पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट आणि पातळ होणार नाही, याची काळजी घ्या.
या पीठात मीठ, हिंग, लाल तिखट, जिरेपूड आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे मसाले देखील टाकू शकता.
आता इडलीचे तुकडे बेसनच्या मिश्रणात चांगले घोळवून घ्या. त्यानंतर एक पॅनमध्ये तेल गरम करून गॅस मंद आचेवर ठेवा.
गरम तेलात एक एक इडलीचे तुकडे सोडा आणि गोल्डन फ्राय करून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत इडलीचे पकोडे तळून घ्या.
तयार इडलीचे पकोडे पुदिन्याच्या चटणीसोबत खा. तुम्ही पावसाळ्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता.
तुम्हाला इडलीचे पकोडे अजून कुरकुरीत पाहिजे असतील तर ब्रेड क्रम्ब्स देखील घोळवू शकता. तसेच पावसाळ्यात गरमागरम चहासोबत पकोडे चटपटीत लागतील.