Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Shreya Maskar

मुंबई पावभाजी

मुंबई स्टाइल पावभाजी बनवण्यासाठी बटाटे, फुलकोबी,हिरवे वाटाणे, गाजर, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, आले-लसूण पेस्ट , पाव भाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळद , लिंबाचा रस, बटर , तेल, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Pav bhaji | pinterest

भाज्या

पावभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे, फुलकोबी, गाजर आणि वाटाणे प्रेशर कुकरमध्ये थोडे मीठ आणि एक कप पाण्यासोबत २-३ शिट्ट्या होईपर्यंत उकळवा. कुकर थंड झाल्यावर भाज्या मॅशरने चांगल्या प्रकारे मॅश करा.

Vegetables | pinterest

चिरलेला कांदा

एका मोठ्या पॅनमध्ये चमचा तेल आणि बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परता. आले-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालून २ मिनिटे शिजवा.

Chopped onion | pinterest

मीठ

पॅनमध्ये चिरलेले टोमॅटो आणि थोडे मीठ घालून टोमॅटोमधून तेल सुटेपर्यंत परता. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर आणि पाव भाजी मसाला घाला. बटर पॅनच्या कडेला सुटेपर्यंत मंद आचेवर मसाले परता.

salt | pinterest

पाणी

मॅश केलेल्या भाज्या भाजलेल्या मसाल्यांमध्ये घालून चांगले मिसळा. भाजी थोडी घट्ट होईल, म्हणून आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता, मसाले आणि भाज्या चांगल्या प्रकारे एकत्र होण्यासाठी पॅनमध्येच मॅशरने भाजी पुन्हा २-३ मिनिटे मॅश करा.

water | pinterest

कोथिंबीर

मंद आचेवर ५-१० मिनिटे भाजी शिजू द्या. शेवटी लिंबाचा रस, हिरवीगार कोथिंबीर आणि तूप टाकून गॅस बंद करा. गरमागरम भाजी तयार आहे.

Coriander | pinterest

पाव भाजी मसाला

शेवटी तव्यावर तूप टाकून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर पाव भाजी मसाला भुरभुरा. पाव अर्धा कापून तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी फ्राय करा.

Pav bhaji masala | pinterest

बटर

अशाप्रकारे मुंबई स्पेशल झणझणीत पावभाजी तयार झाली आहे. बटर, कांदा आणि लिंबाच्या फोडीने पावभाजी सजवा.

Butter | pinterest

NEXT : पावसात घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल झणझणीत मसाला सँडविच पाव, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Masala Sandwich Pav Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...