काँग्रेसच्या काळात मोदी-शहांचा छळ CBIने केला - रावसाहेब दानवे

सीबीआयने चौकशी केल्यानंतर मोदी बाहेर आले, त्यांना पत्रकारांनी विचारलं काही बोलायचं आहे का? त्यांनी त्यावेळी फक्त हात जोडले - दानवे
काँग्रेसच्या काळात मोदी-शहा यांचा छळ CBIने केला - रावसाहेब दानवे
काँग्रेसच्या काळात मोदी-शहा यांचा छळ CBIने केला - रावसाहेब दानवे SaamTvNews

शिर्डी : काँग्रेस सरकारच्या काळात नरेंद्र मोदी (Narendra Modi) व अमित शहांचा (Amit shaha) ईडी सीबीआयने केलेला छळ काँग्रेस नेते विसरलेत का असा सवाल करीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवेंनी ईडी (ED) कारवाईवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलं. शिर्डीत भाजपा प्रवक्ता मेळाव्यासाठी दानवे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे देखील पहा :

सीबीआयने (CBI) नरेंद्र मोदींची चौकशी केल्यानंतर मोदी बाहेर आले आणि त्यांना पत्रकारांनी विचारलं काही बोलायचं आहे का त्यांनी त्यावेळी फक्त हात जोडले. परंतु, नवाब मलिक ईडी ऑफिसच्या बाहेर पडल्यानंतर हात वर करून जल्लोष करून फार मोठी बहादुरी केली असं दाखवत होते. आमच्या लोकांचा ज्यावेळी छळ चालला होता त्यावेळी आम्ही अशा प्रकारे आरोप केले नव्हते असं बोलत दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

काँग्रेसच्या काळात मोदी-शहा यांचा छळ CBIने केला - रावसाहेब दानवे
नांदेड : विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; 20 ते 25 विद्यार्थी जखमी, दुचाकींची तोडफोड!
काँग्रेसच्या काळात मोदी-शहा यांचा छळ CBIने केला - रावसाहेब दानवे
'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यात सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, त्या आरक्षणाला हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आले. फडणवीस सरकारने वकिलांची फौज उभी करून पुरेसे पुरावे गोळा करून ते आरक्षण टिकवण्यामध्ये यश देखील मिळवले होते. परंतु, दुर्दैवाने आमचे सरकार गेले आणि हे तीन पक्षांचे सरकार आले. या तीन पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून जर वकिलांची फौज उभी केली असती, कोर्टाला अपेक्षित असलेले पुरावे सादर केले असते, तर हे आरक्षण टिकू शकले असते. मात्र, या सरकारने आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न केले नाही. असा आरोप महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारवर दानवेंनी केला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com