'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी

'बजरंग बप्पाचे काय चुकले ? असा सवाल उपस्थित करणारे पोस्टर बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी
'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजीSaamTv News

बीड : राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात, राष्ट्रवादीच्या नाराज गटाने डोकं वर काढलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना डावलून, त्यांच्या जागी दोन दिवसापूर्वी राजेश्वर चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, या निवडीनंतर बीड राष्ट्रवादीमधील अंतर्गत खदखद बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. बजरंग सोनवणे यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करत, 'बजरंग बप्पाचे काय चुकले ? असा सवाल उपस्थित करणारे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळं बीड जिल्हा राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही.

हे देखील पहा :

बीड (Beed) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळख असलेले बजरंग सोनवणे हे गेल्या चार वर्षापासून राष्ट्रवादी (NCP) जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या पत्नी देखील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी
नांदेड : विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; 20 ते 25 विद्यार्थी जखमी, दुचाकींची तोडफोड!

चार वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षवाढीसाठी बजरंग सोनवणे यांचे महत्त्वाचे योगदान मानले जात आहे. जिल्हा परिषद मधील सत्तापरिवर्तन, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत 4 मतदार संघात भाजपाला शह देऊन विजय मिळवणे, इतकच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये महत्त्वाचे योगदान होते. शेतकरी पुत्र म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, यामुळे जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार झालेला आहे. त्या बजरंग सोनवणे यांना पक्षाने नेमके जिल्हाध्यक्ष पदावरून का दूर केले? असा प्रश्‍न त्यांच्या कार्यकत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी
विरार गोळीबार प्रकरण, एकाचा झाला होता मृत्यू; शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल

बजरंग सोनवणे यांचा जिल्हाध्यक्ष पदावरील तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर, त्यांना दुसऱ्यादा जिल्हाध्यक्षपदी नियमित करण्यात आलं होत. मात्र, अचानक नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर असं कुठलं कारण घडलं? यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर बजरंग सोनवणे यांना हटवले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केज (Kej) नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांची मुलगी हर्षदा सोनवणे हिचा पराभव झाला. मात्र, केज नगरपंचायतमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला तर तीन जागेवर अवघ्या काही फरकाने पराभव पत्करावा लागला.

'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी
लोणचं खाल्ल्याने वाढते 'इम्युनिटी'; वाचा फायदे

मात्र, यानंतर मुलगी हर्षदा सोनवणे हिच्या पराभवासाठी राष्ट्रवादी अंतर्गत दुसऱ्या गटाने विरोधात काम केल्याचा आरोप देखील केला जात असून या निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे राष्ट्रवादीच्या कुठल्या कार्यक्रमात पाहायला मिळाले नाहीत. खुद्द धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या व्यासपीठावर देखील ते दिसून आले नाहीत. तेव्हापासून सोनवणे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावर राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती देऊन शिक्कामोर्तब केलाय. त्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केले जात आहे.

'पवार साहेब सांगा, बजरंग बप्पाचे काय चुकले?' बीडमध्ये राष्ट्रवादी अंतर्गत नाराजी
धक्कादायक! परळीत खुनाचे सत्र सुरुच; चाकूने वार करत महिलेचा खून

बजरंग सोनावणे समर्थकांकडून खालील आशयाचे पोस्टर व्हायरल होत आहेत.

सर्वात यशस्वी कारकीर्द ठरलेल्या जिल्हाध्यक्षांचे नेमके काय चुकले?

1) आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर, आष्टी तालुक्यात जाऊन फक्त 13 कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. पक्ष वाढवला अन् आज तिथे पक्षाचा आमदार आहे. पडत्या काळात पक्ष संघटन मजूबत केले, हेच तुमचे चुकले.

2) पक्षाचे जिल्हास्तरावर मोर्चे आयोजित केले. पक्षाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन केले. स्वखर्चाने पक्षकार्य केले, हेच तुमचे चुकले.

3) देशातील सर्वात मोठी निवडणूक लढवून, सव्वा पाच लाख मते घेतली. त्यातून तयार झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा विधानसभा निवडणुकीत पक्षाला झाला. बीड जिल्ह्यात पक्षाचे 4 आमदार निवडून आले. मोठ्या आव्हानांना आपण सहज सामोरे जातात, हेच तुमचे चुकले.?

4) अडीच वर्षे विरोधी पक्षाकडे असलेली जिल्हा परिषद आपण राष्ट्रवादी पक्षाच्या हातात आणून दिली. पक्षासाठी अहोरात्र झटलात, हेच तुमचे चुकले.?

5) प्रस्थापितांच्या घरी जन्म न घेता, गरीबाच्या घरी जन्म घेतलात, हेच तुमचे चुकले.

4 वर्षे 8 महिने असा सर्वात अधिक काळ जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आपण पदाला न्याय दिला. पण पक्षाने तुम्हाला काय दिले ? आम्हाला विश्वास आहे की तुम्ही लाथ मारील तिथे पाणी काढणारच.?

सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय?

असा आशय असलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com