Alibag : आ.महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Alibag : आ.महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

अलिबागसह मुरुड आगारातून प्रवाशांसाठी एसटी सेवा सुरू. हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडण्याचा आमदारांनी दिले आश्वासन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग आगारातील एसटी कर्मचारी यांनी तीन दिवसांपासून संप पुकारल्याने ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर आज अलिबाग मुरुड विधानसभा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी कर्मचाऱ्यांबरोबर यशस्वी बोलणी केल्याने कर्मचाऱ्यानी प्रवाशांच्या झालेल्या अडचणीमुळे संप मागे घेतला आहे. आमदार दळवी यांनी हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे आता दिवाळीला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकारक होणार आहे. कर्मचाऱ्यांवर कोणतीही करवाई केली जाणार नाही असे आश्वासनही जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यानी दिले आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी हे कामावर रुजू झाले असून एसटी वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय नियमाप्रमाणे सामावून घ्या, महामंडळाचे विलगिकरण करा या मागण्यासाठी ऐन दिवाळीत संप पुकारला. अलिबाग आगारासह माणगाव, मुरुड, कर्जत, श्रीवर्धन येथील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. माणगाव, कर्जत, श्रीवर्धन आगारातील कर्मचारी हे कामावर रुजू झाले मात्र अलिबाग आणि मुरुड येथील कर्मचारी हे संपाबाबत ठाम राहिले. त्यामुळे या आगारातून गावी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. संपामुळे एसटी प्रशासनाला तीन दिवसात 60 लाखाचा आर्थिक फटकाही सहन करावा लागला.

अखेर आज अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्याशी चर्चा करून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी फोनवर कर्मचाऱ्याचा प्रश्न मांडला. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुमचा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन यावेळी दळवी यांनी कर्मचाऱ्यांना दिले. दिवाळी असल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. तरी आपण हा विचार करावा अशी विनंती केल्याने कर्मचाऱ्यानी आपला संप मागे घेतला आहे. तर कामावर हजर न राहिल्यास कारवाई करण्याच्या नोटीसी कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. कामावर हजर होत असल्याने कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिले आहे. त्यामुळे आमदाराच्या मध्यस्थीने आजपासून अलिबाग आणि मुरुड आगारातून एसटी ची प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांनीही निश्वास सोडला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समिती कसला अभ्यास करणार? कर्जमाफीवरून ठाकरे आक्रमक

Gold Rate : ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त, चांदीचा भावही घसरला; वाचा २२ कॅरेट-२४ कॅरेटचे आजचे दर

Electricity Bill: वीज बिलात ऐतिहासिक कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या किती फायदा होणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली; शिंदेसेनेचे 2 नेते अडचणीत, पालिका निवडणुकीत फटका बसणार?

Bollywood Famous Actor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे तरुण अभिनेत्रींसोबत प्रेमसंबंध; पत्नीने केली हेरगिरी, गुप्तहेराचा खुलासा

SCROLL FOR NEXT