Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Shukra Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषांच्या मते, शुक्र ग्रह उद्या नक्षत्र बदलणार आहे. शुक्र हा ग्रह संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखसोयींशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या बदलामुळे काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडणार आहेत.
Shukra Gochar
Shukra GocharSaam Tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, दैत्यांचा गुरु शुक्र हा अत्यंत शक्तिशाली ग्रह मानला जातो. धन, वैभव, सुख-समृद्धी, भोग-विलास आणि प्रेम यांचा कारक ग्रह शुक्र ठराविक कालांतराने राशीबरोबरच नक्षत्रांमध्येही परिवर्तन करतो. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. सध्या शुक्र वृश्चिक राशीत विराजमान आहे आणि 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

शुक्र या नक्षत्रात 20 डिसेंबरपर्यंत राहणार आहे आणि त्यानंतर केतूच्या मूल नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्राच्या ज्येष्ठा नक्षत्रात आगमनामुळे काही राशींना विशेष लाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

Shukra Gochar
Mahayuti 2025: 100 वर्षांनंतर सूर्य, बुध आणि मंगळ बनवणार त्रिग्रही योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

सिंह राशि (Leo Zodiac)

या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही मोठा फायदा होणार आहे. यावेळी कामाच्या नवीन ऑर्डर मिळतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.

कन्या रास (Virgo Zodiac)

या राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करून तिसऱ्या भावात विराजमान राहणार आहे. त्यामुळे या व्यक्तींना अनेक क्षेत्रांतून मोठा फायदा होणार आहे. नशिबाचा पूर्ण साथ मिळणार आहे. वरिष्ठ अधिकारी कामावर प्रसन्न होणार आहे. जीवनसाथीसोबत आनंदी वेळ घालवता येणार आहे.

Shukra Gochar
Drink Water After Coming From Sun: उन्हातून आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावे? काय सांगतात तज्ज्ञ

मकर रास (Capricorn Zodiac)

शुक्राच्या नक्षत्र गोचरमुळे अनेक इच्छा पूर्ण होणार आहे. परदेशात नोकरी किंवा व्यापार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेहनतीमुळे पदोन्नती आणि बोनस मिळू शकतो. व्यापार क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उघडणार आहे. प्रेमसंबंधही या काळात चांगले राहतील.

Shukra Gochar
Mangal Surya Yuti: 18 वर्षांनंतर एकमेकांच्या जवळ येणार सूर्य-मंगळ; या राशींची होणार चांदीच चांदी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com