Shreya Maskar
हिवाळ्यात आवर्जून भरपूर हिरवीगार भाज्यांचे सेवन करा. यामुळे आरोग्याला चांगले फायदे होतात. रेसिपी आताच लिहून घ्या.
मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मुळा, हिंग, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, तेल, हळद, ओवा, लाल तिखट, मीठ इत्यादी साहित्य लागते.
मुळ्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून सालं काढून बारीक चिरून घ्या. तुम्ही भाजी गरम पाण्यात देखील स्वच्छ करू शकता.
त्यानंतर मुळ्याचा पालाही धुवून चिरून घ्या. भाजी बारीक चिरा, जेणेकरून मुलं आवडीने भाजी खातील.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ओवा आणि हिंग टाका. तसेच हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून भाजी चांगली परतून घ्या.
त्यानंतर भाजीत मुळा, हळद आणि मीठ घालून मिक्स करा. भाजीला चांगले पाणी सूट द्या, जेणेकरून ती मस्त शिजेल.
भाजीला एक वाफ आल्यावर त्यात चाट मसाला घालून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
मुळ्याची गरमागरम भाजी तुम्ही पोळी, भाकरीसोबत खाऊ शकता. तसेच भात-डाळ सोबतही भाजी चांगली लागेल.