शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने खरेदीदाराने केली शेतकऱ्याची फसवणूक... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने खरेदीदाराने केली शेतकऱ्याची फसवणूक...

शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्याची खरेदीदाराने फसवणूक केली आहे. पेण तालुक्यातील कोपर गावच्या शेतकऱ्याचे न्यायासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे सुरु आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची खरेदीदाराने फसवणूक केली आहे. पेण तालुक्यातील कोपर गावच्या शेतकऱ्याचे न्यायासाठी दोन वर्षांपासून पेण प्रशासन कार्यालयात हेलपाटे सुरु आहेत. पेण तालुक्यातील कोपर गावचे शेतकरी लक्ष्मण भोईर यांनी शेतजमीन विक्री व्यवहारात शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने खरेदीदाराने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दोन वर्षांपासून शेतकरी लक्ष्मण भोईर हे न्याय मागण्यासाठी पेण तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. (With the connivance of government officials, the buyer cheated the farmer ...)

हे देखील पहा -

जिल्ह्यात एकीकडे भात लागवड क्षेत्र कमी होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यासह पेण तालुक्यात नवे औद्योगिक क्षेत्र, महामार्ग येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शेतजमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. कोरोनामुळे थांबलेले जमीन खरेदी व्यवहार बंद होते. मात्र आता पुन्हा हे व्यवहार सुरू झाले आहेत. शेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकारातही मोठी वाढ होताना दिसत आहे.

पेण तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण भोईर आणि भरत भोईर याची कोपर गावात गट नंबर 58/3 क क्षेत्र 32 गुंठे शेतजमीन मिळकत आहे. या जमिनीचा भूधारण पद्धत बदलण्यासाठी लक्ष्मण भोईर यांनी 2019 साली तत्कालीन पेण तहसीलदार याच्याकडे अर्ज केला होता. त्याचा 40 टक्के नजराणाही भोईर भरण्यास तयार होते. मात्र तहसीलदार आणि कार्यालयीन अधिकारी यांनी वेळोवेळी चालढकलपणा करून भोईर यांना दोन वर्षे लटकत ठेवले. याच दरम्यान जमीन विक्रीचा व्यवहार खरेदीदार रमेश रामदुलार यादव यांच्यासोबत ठरला. एक लाख गुंठे प्रमाणे 32 लाख 40 हजार रुपये अशी जागेची रक्कम ठरली. त्याप्रमाणे खरेदीदार रमेश यादव यांनी 5 लाख रुपये चेकच्या माध्यमातून भोईर यांना पैसे दिले. उर्वरित रक्कम खरेदीखत झाल्यानंतर देण्याचे कबूल केले.

त्यानंतर खरेदीदार यादव यांना भोईर यांनी कुळमुखत्यार पत्र देऊन फक्त निष्पादनाचा अधिकार दिला होता मात्र सहीचा अधिकार नव्हता. मात्र यादव यांनी या कुळमुखत्यारपत्राचा गैरवापर करून पेण तहसीलदार, कर्मचारी, दुय्यम निबंधक, तलाठी यांना हाताशी धरून परस्पर खरेदीखताचा व्यवहार करून लक्ष्मण भोईर यांची फसवणूक केली. लक्ष्मण भोईर आणि त्यांच्या भावाची सही, अंगठा खोटा मारून परस्पर खरेदी खताची कागदपत्रही तयार केली. जमिनीची भूधारण पद्धत बदल झाल्याचेही प्रशासनाने भोईर यांच्यापासून लपवून ठेवले. हे कळल्यानंतर लक्ष्मण भोईर आणि त्याचा मुलगा सतीश भोईर हे गेली दोन वर्षे पेण तहसीलदार कार्यालयात रोज न्यायासाठी दाद मागत आहेत. मात्र निगरगट्ट शासकीय अधिकारी हे त्यांच्या ताकाला सूर लावून देत नाहीत.

याबाबत भोईर यांनी आता कायदेशीर मार्ग अवलंबला असून आम्हाला न्याय द्या, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी लक्ष्मण भोईर यांनी केली आहे. लक्ष्मण भोईर यांच्यासारखे अनेक शेतकरी याची फसवणूक झाल्याचे प्रकार जिल्ह्यात कुठेना-कुठे होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना काळजी घेणे अंत्यत महत्वाचे आहे. अन्यथा फसवणूक झाली म्हणजे समजा...

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT