Thackeray brothers alliance, Uddhav Thackeray, Raj Thackeray : ठाकरे बंधूंची युती होणार का? हा महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत आलेला प्रश्न.. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्यानं पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य केलयं. आता या स्वप्नवत वाटणाऱ्या य़ुतीचं काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray : ठाकरे बंधु एकत्र येणार का अशी उत्सुकता साऱ्या महाराष्ट्राला लागली होती. मात्र राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही युती, आघाडीच्या भरवशावर राहू नका असे आदेश दिले. ज्यामुळे युतीच्या चर्चांना ब्रेक लागला असला तरी अधूनमधून या चर्चांना उधाण येतचं असतं. त्यात आता ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केलीय.
ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरून परतल्यावर युतीबाबत काही ठोस चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून वारंवार भाष्य केलं. मात्र उद्धव ठाकरेंनी भरसभेत राज ठाकरेंना साद घातल्यानंतर पुन्हा कधीही युतीबाबत शब्द काढलेला नाही. तर दुसरीकडे राज ठाकरेंही मौन बाळगून आहेत. त्यात उद्धव ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आलेला नसल्याचं मनसेक़डून सांगण्यात आलयं.
साद, प्रतिसाद ते शिंदेसेनेसोबत युती अशा अनेक चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीच्या अनुषंगाने समोर आल्या. मात्र महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगणाऱे ठाकरे बंधू खरच एकत्र येतील का? असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय. अर्थात या प्रश्नाचं खरं उत्तर ठाकरे बंधूच देऊ शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.