Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी

Thackeray Sena rift : नाशिकमध्ये स्थानिक निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात खळबळ! उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाराजी व्यक्त करत पक्षात फूट पडण्याचे संकेत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुप्त भेटीमुळे चर्चेला उधाण.
Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Nashik political crisis : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची चिन्हं आहेत. ठाकरे सेनेच्या नेत्यानं एक मोठा गौप्यस्फोट केलाय. ज्यामुळे ठाकरे सेनेला खिंडार पडणार आहे? ते कसं पाहूयात साम टिव्हीचा या स्पेशल रिपोर्टमधून...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिंदेंशी घरोबा केलाय. त्यावेळी एकट्यानं खिंड लढवणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्या एका वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ माजलीय.

विशेष म्हणजे एक दिवस आधीच सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. आपली नाराजी जाहीरपणे उघड करत बडगुजर यांनी पक्षाला आणखी एक धक्का दिलाय.

Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी
Solapur Shock : पुण्यानंतर सोलापूर हादरलं! ३ महिन्याच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल, सासरच्यावर संशायची सुई

कोण आहेत सुधाकर बडगुजर

- शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते

- लोकसभा निवडणुकीवेळी एकट्याने खिंड लढवत पक्षाचा खासदार निवडून आणला

- विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव

- १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

- महापालिकेत नगरसेवक असतांना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी ACB कडून चौकशी

- ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेण्या हल्ल्या प्रकरणी बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई

Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी
Jalgaon Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, २ जणांचा मृत्यू, १५ जखमी | VIDEO

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एक हाती आलेली सत्ता यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत होत्या. आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलय, त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत दिले असल्याचीच चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असले तरी ठाकरे गटात काही अलबेल नाही हेच सिध्द झालंय.

Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी
Kalyan : कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?

विशेष म्हणजे जे महानगर प्रमुख विलास शिंदे नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय. त्या विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांची उपस्थिती लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास मुंबईहून विमानाने आले होते. त्यांची ही उपस्थिती राजकीय घडामोडींचे संकेत देणारी होती.

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे हे दोघेही नाराज असल्याचा बातम्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बडगुजर यांच्यासह महानगरप्रमुख विलास शिंदे आणि अन्य पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले, तर उद्धव ठाकरेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय.

Nashik : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा धक्का? नाशिकमध्ये खिंडार पडणार, शिलेदारांची उघड नाराजी
अकोला हादरलं! बाजारात कडाक्याचा वाद, पोटावर, छातीवर सपासप वार, २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com