Solapur Shock : पुण्यानंतर सोलापूर हादरलं! ३ महिन्याच्या गर्भवतीचं टोकाचं पाऊल, सासरच्यावर संशायची सुई

pregnant woman suicide : सोलापूरच्या आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, मात्र कुटुंबियांचा सासरच्या मंडळींवर हत्या केल्याचा आरोप. ३ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या आशा भोसले यांच्या मृत्यूनं खळबळ.
Solapur Crime: 3-Month Pregnant Asha Bhosale Found Dead, Family Alleges Murder
Solapur Crime: 3-Month Pregnant Asha Bhosale Found Dead, Family Alleges MurderSaam TV News
Published On

Solapur crime news, pregnant woman suicide : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असतानाच आता सोलापूरही हादरले आहे. सोलापूरमध्ये ३ महिन्याच्या गर्भवती आशाराणी भोसले यांच्या आत्महत्यामुळे खळबळ उडाली आहे. आशा भोसले यांनी यांनी आत्महत्या केली नसून हत्याचा झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले यांनी टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक म्हणजे, आशा भोसले या तीन महिन्याच्या गर्भवती होत्या, त्यामुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आशा भोसले यांच्या आई-वडिलांकडून सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पुण्या नंतर आता सोलापूर देखील हादरलं आहे. आशाराणी भोसले यांनी टोकाचे पाऊल उचलले. आशाराणी भोसले यांची हत्या की आत्महत्या? असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. मोहोळ तालुक्यात सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून आशा भोसले यांनी टोकाचे पाऊल उछलले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Solapur Crime: 3-Month Pregnant Asha Bhosale Found Dead, Family Alleges Murder
RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

सोलापूरजवळील चिंचोली एमआयडीसी येथे राहणाऱ्या विवाहित आशा भोसले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण चिंचोली एमआयडीसी येथे आशाराणी भोसले हिचा गळफास बनाव असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. आशाराणी भोसले तिने गळफास घेतल्यानंतर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आशा भोसले यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Solapur Crime: 3-Month Pregnant Asha Bhosale Found Dead, Family Alleges Murder
शेतमजूर बापाकडे BMW मागितली, गरीब बिचाऱ्याने स्विफ्ट डिझायर घेऊन दिली; हट्टी पोराने आयुष्य संपवलं

आशाराणी भोसले यांना तीन वर्षाची मुलगी आहे. टोकाचा निर्णय घेतला त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याची गरोदर असल्याची नातेवाईकांनी सांगितले. अशा राणी भोसले हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता. आतापर्यंत चार ते पाच वेळा घरगुती वाद मिटवल्याचेही मृत आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Solapur Crime: 3-Month Pregnant Asha Bhosale Found Dead, Family Alleges Murder
Akola Crime: प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट तरुणीची हत्या, ज्याच्यासाठी दिल्लीहून अकोल्यात आली, त्यानेच काटा काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com