Nana Patole Saam Tv News
महाराष्ट्र

Nana Patole: 10 मार्चनंतर सरकारमध्ये फेरबदल करणार - नाना पटोलेंचं वक्तव्य...(पहा Video)

ठाकरे सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली

अभिजित घोरमारे

भंडारा: ठाकरे सरकार सत्तेमध्ये येऊन अडीच वर्षे झाली. सरकार पडण्याच्या तारखा भाजप नेत्यांकडून सध्या वारंवार देण्यात येत आहे. मात्र त्याचा काही परिणाम दिसला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच १० मार्चचा दिवशी नवा मुहूर्त दिला. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील १० मार्चचा उल्लेख केला आहे. १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे पटोलेंनी यावेळी सांगितले आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.

पहा व्हिडिओ-

सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. 10 मार्चनंतर राज्य सरकारमध्ये निश्चितपणे मोठे बदल बघायला मिळणार आहेत, असे नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. सध्या निवडणुका सुरू आहेत. माझं सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी बोलणं झाले आहे. 10 मार्चपर्यंत संधी द्या. जे काही सध्या चाललंय आपल्या या सरकारमध्ये याला देखील दुरुस्त करायची वेळ आपल्या हाती आहे. सरकारमध्ये आपले 12 मंत्री आहेत,' असे नाना पटोले पुढे म्हणाले.

नाना पटोलेंच्या विधानावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. 10 मार्चनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट बघायला मिळणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकणार आहे. आता सरकारमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, काँग्रेस कोणत्या मंत्र्याला बाजूला करणार, कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता राहणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT