जालना: जालना तालुक्यातील सेवली येथील शासकीय जमिनीवर परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती.काल मध्यरात्रीच्या सुमारास प्रशासनाकडून हा पुतळा रातोरात हटवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर काल सेवलीमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.
हे देखील पहा-
दरम्यान काल रात्रीच्या सुमारास हा पुतळा हटवण्यात आला असून सेवली पोलिसांनी पुतळा बसवणाऱ्या 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यात काही भाजप कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदार संघातील बाजारपेठा बंद ठेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान पोलिसानी गामविकास अधिकारी यांच्या तक्रारी वरून याचं परिसरात अनिधकृतपणे हिरवा ध्वज लावून चौकाला टिपू सुलतान नामकरण केलेला फलक ही हटवत फलक लावणाऱ्या तीस जणा विरुद्ध जमावबंदी आदेश जुगारून गैरकायद्याची मंडळी जमावल्या प्रकरणी ही मुस्लिम समाजाच्या ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, या प्रकणी अधिक तपास पोलिस करत आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.