Sangli: मिरजेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटूंबियांवर टोळक्याचा हल्ला

शहरात नशेखोर तरुणांची दहशत
Sangli: मिरजेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटूंबियांवर टोळक्याचा हल्ला
Sangli: मिरजेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटूंबियांवर टोळक्याचा हल्लाविजय पाटील
Published On

सांगली: सांगलीच्या (Sangli) मिरजेतील (Miraj) शिवाजी चौकात रिक्षा व्यवसाय करणारे नामदेव वेंकू मोरे (वय-५६) यांना नशेखोर तरुणांच्या टोळक्यांनी पैसे दिले नाही, म्हणून  सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे आणि त्याचे वडील नामेदव मोरे आणि त्यांच्या कुटूंबियांवर हल्ला (Attack) करून मारहाण (Beating) करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये त्याच्या  डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. जखमींना सांगली (Sangli) शासकीय रूग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत. (Sangli Gang attack on families of social workers)

हे देखील पहा-

शिवाजी चौक, कर्मवीर भाऊराव चौक आणि गांधी चौक या परिसरात नशेखोर तरुणांची टोळकी छोटे व्यावसायिक (Professional) आणि नागरिकांना दादागिरी करून पैसे काढून घेतात. रविवारी या नशेखोर तरुणांनी नामदेव मोरे यांनाही पैशाची मागणी केली होती. परंतु, मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना ठकलून देवून रिक्षावर दगड मारून रिक्षा फोडली आहे. तसेच त्यांना बेदम मारहाण (Beating) देखील करण्यात आली आहे, याची माहिती त्यांच्या दोन मुलांना समजल्यानंतर दोन मुले व नामेदव मोरे यांची पत्नीही तेथे आले होते.

Sangli: मिरजेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटूंबियांवर टोळक्याचा हल्ला
Fodder Scam Case: सीबीआय न्यायालयाचा निर्णय; चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी

या प्रकरणाचा त्यांनी मारहाणीची जाब विचारल्यानंतर त्यांना देखील बेदम मारहाण (Beating) करण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सदर नशेखोर तरुणांच्यावर कारवाई करावी ,अशी मागणी नगरसेवक (Corporator) शिवाजी दुर्वे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव, सचिन जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com