Fodder Scam Case: सीबीआय न्यायालयाचा निर्णय; चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढले
लालूप्रसाद यादव
लालूप्रसाद यादव Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांच्या अडचणी वाढले आहेत. चारा घोटाळ्यामध्ये पाचवे सर्वात महत्वाच्या दोरांडा (Doranda) कोषागार प्रकरणी रांचीमधील विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. तसेच या प्रकरणामध्ये २४ जणांना न्यायालयाने दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १९९६ सालापासून सुरू असलेल्या या खटल्याचा तब्बल २६ वर्षानंतर निकाल लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यांना १३९ कोटींच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवले. हे या घोटाळ्यातील ५ आणि सर्वांत मोठे प्रकरण होते. (fodder scam case rjd chief lalu prasad yadav convicted fraudulent withdrawal doranda treasury cbi special court)

हे देखील पहा-

२३ वर्षे जुने काय आहे प्रकरण

चारा घोटाळ्याशी संबंधिमध्ये या प्रकरणात २९ जानेवारी रोजी बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण केल्यावर, सीबीआय विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुमारे २३ वर्षे जुने हे प्रकरण १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याविषयीचे आहे.

लालूप्रसाद यादव
Dilip Walse Patil: परवानगी न घेता पुतळा उभा करणाऱ्यांना गृहमंत्र्यांचा इशारा

लालू प्रसाद ४ प्रकरणात दोषी

या खटल्यामध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. ज्यामध्ये एकूण ५७५ साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले होते. तर बचाव पक्षाच्या वतीने २९ जानेवारी रोजी ११० आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. लालू प्रसाद यांचा देखील यामध्ये समावेश आहे. बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या ४ प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com